प्रत्येक व्यक्ती वाचण्याच्या संधीसाठी पात्र असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, 285 दशलक्ष लोक हे दृष्टीदुर्बल आहेत, ज्यापैकी 90% विकसनशील देशांमध्ये राहतात. यापेक्षाही अधिक लोकांना शिकण्याची आणि शारीरिक अक्षमता आहे ज्यामुळे वाचणे कठीण होते. वाचण्यात येणार्‍या या अडथळ्यांमुळे लोकांना शिक्षण घेणे, काम मिळवणे आणि समाजात सहभागी होण्यास प्रतिबंध होतो.

बुकशेअर® ही एक ईपुस्तक लायब्ररी आहे जी वाचन सुलभ करते. अक्षम असलेले लोक ध्वनी, ब्रेल आणि इतर प्रवेशयोग्य स्वरूपांमध्ये पुस्तके वाचू शकतात आणि त्यांच्यासाठी योग्य असणार्‍या पद्धतींद्वारे त्यांचे अनुभव सानुकूलित करू शकतात. प्रकाशकांसह भागीदारी करून आणि स्वयंसेवकांच्या सहाय्याने, बुकशेअर ईपुस्तकांचा जगातील सर्वात मोठा संग्रह प्रवेशसुलभ स्वरूपांत प्रदान करते. पात्र अक्षमता असलेल्या लोकांसाठी सदस्यत्व मोफत आहे.

बुकशेअर हा बेनेटेक चा एक उपक्रम आहे, ही एक गैर-सरकारी संस्था आहे जी सामाजिक कल्याणासाठी सॉफ्टवेअर बनवून समुदायांना सक्षम बनवते. 2001 पासून, अक्षम लोकांसाठी योग्य असलेल्या पद्धतींनी त्यांना वाचन करण्यास बुकशेअर मदत करीत आहे. आज, बुकशेअर 70 पेक्षा जास्त देशांमधील हजारो अक्षम लोकांना सेवा प्रदान करीत आहे.

तुम्हाला तुमच्या देशात बुकशेअर सुरू करायचे आहे का? भागीदारी करण्याविषयी जाणून घ्या .