बुकशेअर वेबसाइटला भेट देणार्‍या प्रत्येकाला स्वागत झाल्याची आणि सर्वोत्तम अनुभवाची भावना व्हावी अशी आमची इच्छा आहे. सर्वोत्कृष्ट अनुभव कसा प्रदान करावा याचा विचार करताना, आम्ही वेब सामग्री प्रवेशसुलभता मार्गदर्शकतत्त्वांकडे (डब्ल्यूसीएजी) 2.0 कडे वळलो. शक्य तितके संभाव्य प्रेक्षक वेब सामग्रीचा वापर करू शकतील आणि संवाद साधू शकतील अशा रीतीने ही मार्गदर्शकतत्त्वे अपंग लोकांसाठी आणि प्रत्येक वापरकर्त्यासाठी वेब अधिक सुलभ आणि मैत्रीपूर्ण कसे बनवायचे हे स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, ही मार्गदर्शक तत्त्वे हे सुनिश्चित करण्यास मदत करतात की फक्त कीबोर्डचा आणि ब्रेल रीडर्स आणि स्क्रीन मॅग्निफायर्ससारख्या सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांना साइट्समध्ये सहजच प्रवेश करता येईल. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वेब सामग्री प्रवेशसुलभतेच्या तीन स्तरांचा (ए, एए आणि एएए) समावेश आहे. आम्ही स्तर AA ची बुकशेअर वेबसाइटसाठी लक्ष्य म्हणून निवड केली आहे, याचाच अर्थ आम्ही स्तर ए आणि एए च्या सर्व निकषांची संपूर्ण पूर्तता केली आहे. शक्य तिथे आम्ही स्तर एएए निकषांची पूर्तता देखील केली आहे. मूल्यमापन करण्यासाठी आणि बुकशेअर साइट वापरण्यास आवश्यक असलेली सर्व माहिती शोधणे सोपे होण्यासाठीही आम्ही प्रयत्न केले आहेत.