आपला पासवर्ड पुनर्स्थापित करण्यासाठी येथे जा: पासवर्ड विसरला आणि तुमचा ईमेल पत्ता लिहा. आपल्याला नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी एक दुवा ईमेल केला जाईल.

संपूर्ण मदत लेख पहा

वापरकर्ते आयबुक्सचा वापर करून त्यांच्या अॅपल संगणकांवर आणि आयओएस मोबाईल उपकरणांवर (जसे की आयफोन) वर आमचा ईपीयुबी फॉरमॅट वाचू शकतात.  

 1. आपल्या खात्यात लॉग इन करा.

 2. पृष्ठाच्या वरच्या भागातील शोध बॉक्स वापरुन पुस्तक शोधा.

 3. शोध परिणामांमध्ये पुस्तक सापडल्यानंतर, डाउनलोड फॉरमॅट ड्रॉप डाउन मेनूमधून ईपीयुबी निवडा, त्यानंतर डाउनलोड बटण निवडा.

 4. एकदा पुस्तकाचे पॅकेजिंग पूर्ण झाले की तयार फाइल डाउनलोड करण्याचा पर्याय निवडा.

 5. अॅपल बुक्समध्ये उघडण्याच्या बटणचा पर्याय निवडा.

 

संपूर्ण मदत लेख पहा

प्रत्येक वेब ब्राउझर आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम तुमची पुस्तके विविध ठिकाणांवर जतन करू शकतो. विंडोज संगणकांमध्ये, तुमचे डाउनलोड फोल्डर अथवा तुमचे डॉक्युमेंट्स फोल्डर आधी तपासा.

जर तुम्हाला तेथे फाईल सापडली नाही तर तुम्ही डाउनलोड केलेले पुस्तक तुमच्या संगणकावर देखील शोधू शकता. स्पेसला अंडरस्कोअरने बदलत पुस्तकाच्या नावाचे पहिले काही शब्द हे फाईलचे नाव असेल.

विंडोज संगणकावर तुम्ही स्टार्ट बटणावर क्लिक करून (किंवा मॅकवर कंट्रोल आणि शिफ्ट दाबून) आणि शोध करणे निवडून तुमचा संगणक शोधू शकता. जर तुम्हाला अद्याप पुस्तक सापडले नाही तर तुम्ही ग्राहक सेवेशी संपर्क करू शकता अथवा पुस्तक पुन्हा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू शकता.  

संपूर्ण मदत लेख पहा

संगणक किंवा ब्रेल नोट-टेकर वापरुन बीआरएफ फाईल्स डाउनलोड करण्यासाठी, कृपया खालील टप्प्यांचे अनुसरण करा. कृपया लक्षात घ्या की एखादा टॅब्लेट अथवा स्मार्टफोन वापरून बीआरएफ फाईल्स डाउनलोड करण्यासाठी हे टप्पे कार्य करत नाहीत.

 1. आपल्या खात्यात लॉग इन करा

 2. शोध बॉक्स वापरुन एखादे पुस्तक शोधा

 3. पुस्तकाचे शीर्षक निवडा

 4. डाउनलोड फॉरमॅट ड्रॉप डाउन (कॉम्बो) बॉक्समधून बीआरएफ निवडा, त्यानंतर डाउनलोड बटण दाबा

 5. आपण फाइल उघडू किंवा जतन करू इच्छित आहात का असे विचारल्यास, कृपया जतन करा हे निवडा, मग आपण ते सहजपणे शोधू शकाल असे एखादे स्थान निवडा

टीप: बहुतेक वेब ब्राउजर्स आपोआप डाउनलोड फोल्डरमध्ये फाईल्स जतन करतात.

संपूर्ण मदत लेख पहा

एक पुस्तक शोधा

लायब्ररीसाठी मुखपृष्ठाच्या सर्वात वरील शोध बॉक्स मध्ये जा. शोध बॉक्समध्ये शब्द किंवा वाक्यप्रचार लिहा ज्यात पुस्तकाचे नाव, लेखक किंवा पुस्तकातील महत्वाच्या शब्दांचा समावेश असेल. आमचे शक्तीशाली शोध इंजिन लायब्ररीमधील सर्व पुस्तकांची शीर्षके, लेखकांची नावे आणि तपशील तपासेल.

पुस्तक डाउनलोड करा

तुम्हाला आवडणारे पुस्तक सापडल्यानंतर, तुम्ही ते डाउनलोड करण्यास आणि वाचण्यास तयार असाल!

पुस्तक वाचा

आमची पुस्तके वाचण्यासाठी सर्वात लोकप्रिय मार्गः केवळ ऑडिओ/ध्वनी, रिफ्रेश करण्यायोग्य ब्रेल उपकरणावर ब्रेलमध्ये किंवा सिंक्रोनाइझ केलेल्या ऑडिओ आणि हायलाइट केलेल्या शब्दांसह.

 • ध्वनीचा वापर आंधळे असलेले लोक किंवा जेव्हा मजकूराची आवृत्ती पाहणे शक्य नसते अशा स्थितीमध्ये केला जातो.
 • ध्वनी आणि मजकूर हायलाईट करणे, विशेषत: डिसलेक्सिया अथवा डोळे-फिरवण्याची समस्या यासारख्या शिकण्यास अक्षमता असणार्‍या लोकांसाठी उपयोगाचे असते.
 • ब्रेल, जसे रिफ्रेश करण्यायोग्य ब्रेल उपकरणावर किंवा एम्बॉस्ड.
संपूर्ण मदत लेख पहा

पुस्तके ऐकण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही पुस्तक कसे वाचू शकाल हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला कदाचित वाचन साधने पृष्ठ सर्वप्रथम वाचणे आवडेल. 

 • आयओएस किंवा अँड्रॉईड अॅप्स
  • डॉल्फिनच्या इझीरिडर सारखे पुस्तकाचा मजकूर आवाजात वाचून सांगणारे एखादे वाचनाचे साधन तुम्ही वापरत असाल तर तुम्ही पुस्तक शोधू शकता, ते उघडू शकता आणि त्या वाचन साधनावर थेट ऐकू शकता.
 • अॅपल पुस्तके
  • जर तुम्हाला अॅपल बुक्स वापरुन पुस्तके वाचायची सवय असेल तर ईपीयूबी मध्ये पुस्तक डाउनलोड करा आणि ते अॅपल बुक्स मध्ये उघडा, ज्यामध्ये मोठ्याने वाचून दाखवण्याची सुविधाही आहे.
 • मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एज ब्राउजरः
  • जर तुम्ही वर्ड वापरत असाल तर डॉक्स मध्ये पुस्तक डाउनलोड करा आणि ते वर्ड मध्ये उघडा, ज्यामध्ये मोठ्याने वाचून दाखवणारा इमर्सिव्ह रीडर पर्याय आहे
  • जर तुम्ही एज ब्राउझर वापरत असल्यास, ईपीयुबी मध्ये पुस्तक डाउनलोड करा आणि ते आपल्या ब्राउजरमध्ये उघडा, ज्यामध्ये मोठ्याने वाचून दाखवणारा इमर्सिव्ह रीडर पर्याय आहे
 • ऑडिओ प्लेयर्स (डेझी ऑडिओ किंवा एमपी3)
  • डेझी ऑडिओ किंवा एमपी3 फाइलची आवश्यकता असलेला एखादा प्लेअर तुम्ही वापरत असल्यास, तुम्हाला या वेबसाइटवरून पुस्तकाची ऑडिओ फाइल शोधणे आणि डाउनलोड करणे आवश्यक आहे. मग फाइल उघडण्यासाठी ती तुम्ही प्लेअरमध्ये न्या आणि चालू करून ऐका.
  • ऑडिओमध्ये उपलब्ध असलेली बहुतेक पुस्तके संगणकीय आवाज वापरणारे एखादे "टेक्स्ट-टू-स्पीच" (टीटीएस) इंजिन निर्माण करतात. हे टीटीएस इंजिन सध्या केवळ इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेची पुस्तके तयार करू शकते मात्र त्यामध्ये आणखी भाषा समाविष्ट होत आहे.
  • टीटीएस भाषांव्यतिरिक्त, लायब्ररी भविष्यात मानवाने-कथन केलेल्या पुस्तकांचा समावेश करेल.
संपूर्ण मदत लेख पहा

डेझी आणि बीआरएफ प्रवेशसुलभ सामग्रीसाठीचे डिजिटल फॉरमॅट आहेत (डेझी म्हणजे डिजिटल प्रवेशसुलभ माहिती प्रणाली आणि बीआरएफ म्हणजे ब्रेल रेडी फॉरमॅट आहे).

 • डेझी फॉरमॅटची पुस्तके केवळ ध्वनीच्या स्वरूपात वाचली जाऊ शकतात किंवा एकाच वेळी ती ध्वनी आणि सिंक्रोनाइज केलेल्या केलेल्या शब्दाला अधोरेखित करून देखील वाचली जाऊ शकतात. जर आपल्याला केवळ ऑडिओ हवा असल्यास आपण आमचा डेझी ऑडिओ डाउनलोड फॉरमॅट निवडू शकता.  जर आपल्याला पुस्तक ऐकायची इच्छा असेल आणि स्क्रीन वर शब्द हायलाइट केलेले हवे असतील तर आमचा डेझी मजकूर किंवा प्रतिमा फॉरमॅटसह डेझी यापैकी एक निवडा. आपल्याला या फाइल्स वाचणाऱ्या एका सॉफ्टवेअर किंवा मोबाईल अनुप्रयोगाची गरज भासेल.
 • बीआरएफ एक डिजिटल ब्रेल फाइल आहे जी रीफ्रेश करण्यायोग्य ब्रेल डिस्प्ले डिव्हाइस आणि इतर सहाय्यक तंत्रज्ञान सॉफ्टवेअरद्वारे वाचली जाऊ शकते. तुम्हाला तुमच्या खाते प्राधान्यांमध्ये संकुचित किंवा असंकुचित ब्रेल पाहिजे का याची निवड तुम्ही करू शकता.

आमची पुस्तके वाचणार्‍या सॉफ्टवेअरच्या अधिक माहितीसाठी, इथे भेट द्या: वाचन साधने.

संपूर्ण मदत लेख पहा