पुस्तके ऐकण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही पुस्तक कसे वाचू शकाल हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला कदाचित वाचन साधने पृष्ठ सर्वप्रथम वाचणे आवडेल. 

 • आयओएस किंवा अँड्रॉईड अॅप्स
  • डॉल्फिनच्या इझीरिडर सारखे पुस्तकाचा मजकूर आवाजात वाचून सांगणारे एखादे वाचनाचे साधन तुम्ही वापरत असाल तर तुम्ही पुस्तक शोधू शकता, ते उघडू शकता आणि त्या वाचन साधनावर थेट ऐकू शकता.
 • अॅपल पुस्तके
  • जर तुम्हाला अॅपल बुक्स वापरुन पुस्तके वाचायची सवय असेल तर ईपीयूबी मध्ये पुस्तक डाउनलोड करा आणि ते अॅपल बुक्स मध्ये उघडा, ज्यामध्ये मोठ्याने वाचून दाखवण्याची सुविधाही आहे.
 • मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एज ब्राउजरः
  • जर तुम्ही वर्ड वापरत असाल तर डॉक्स मध्ये पुस्तक डाउनलोड करा आणि ते वर्ड मध्ये उघडा, ज्यामध्ये मोठ्याने वाचून दाखवणारा इमर्सिव्ह रीडर पर्याय आहे
  • जर तुम्ही एज ब्राउझर वापरत असल्यास, ईपीयुबी मध्ये पुस्तक डाउनलोड करा आणि ते आपल्या ब्राउजरमध्ये उघडा, ज्यामध्ये मोठ्याने वाचून दाखवणारा इमर्सिव्ह रीडर पर्याय आहे
 • ऑडिओ प्लेयर्स (डेझी ऑडिओ किंवा एमपी3)
  • डेझी ऑडिओ किंवा एमपी3 फाइलची आवश्यकता असलेला एखादा प्लेअर तुम्ही वापरत असल्यास, तुम्हाला या वेबसाइटवरून पुस्तकाची ऑडिओ फाइल शोधणे आणि डाउनलोड करणे आवश्यक आहे. मग फाइल उघडण्यासाठी ती तुम्ही प्लेअरमध्ये न्या आणि चालू करून ऐका.
  • ऑडिओमध्ये उपलब्ध असलेली बहुतेक पुस्तके संगणकीय आवाज वापरणारे एखादे "टेक्स्ट-टू-स्पीच" (टीटीएस) इंजिन निर्माण करतात. हे टीटीएस इंजिन सध्या केवळ इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेची पुस्तके तयार करू शकते मात्र त्यामध्ये आणखी भाषा समाविष्ट होत आहे.
  • टीटीएस भाषांव्यतिरिक्त, लायब्ररी भविष्यात मानवाने-कथन केलेल्या पुस्तकांचा समावेश करेल.
Audience
सदस्य
Help Topics
सदस्य - पुस्तके डाउनलोड करणे आणि वाचणे